बातम्या

शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? – काँग्रेसचा सवाल; ३ जूनला दाभडीत पदयात्रा

What happened to the promises made to farmers


By nisha patil - 5/30/2025 10:31:02 PM
Share This News:



शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? – काँग्रेसचा सवाल; ३ जूनला दाभडीत पदयात्रा

मुंबई, ३० मे २०२५ – एमएसपी (हमीभाव) मध्ये केंद्र सरकारने केलेली वाढ ही युपीए सरकारच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी असून, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

गांधी भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात एमएसपीमध्ये केवळ ४५% वाढ झाली, तर मनमोहन सिंग सरकारने १० वर्षांत १२० ते १५०% वाढ केली होती. याशिवाय, शेतीसाठी लागणाऱ्या इनपुट्सवर महागाई आणि जीएसटीमुळे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

सरकार ज्वारी, मका, बाजरी, नाचणी, हरभरा यासारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊनही केवळ नगण्य खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडे माल विकावा लागतो. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे.

काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास एमएसपीला कायदेशीर हमी देणारा कायदा करेल, असे सपकाळ यांनी सांगितले. ३ जून रोजी यवतमाळच्या दाभडी गावात काँग्रेस 'क्या हुआ तेरा वादा?' या आंदोलनात मोदींनी २०१४ मध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देणार आहे.

यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यांवरही सपकाळ यांनी तीव्र टीका करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना लगाम घालावा, अन्यथा काँग्रेस आणि शेतकरीच त्यांना योग्य उत्तर देतील, असा इशाराही दिला.


शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? – काँग्रेसचा सवाल; ३ जूनला दाभडीत पदयात्रा
Total Views: 65