बातम्या
१०० नंतरचं काय?" – सतेज पाटील यांचा थेट सवाल...
By nisha patil - 7/17/2025 11:41:13 AM
Share This News:
१०० नंतरचं काय?" – सतेज पाटील यांचा थेट सवाल...
शेतीच्या नावाखाली सरकारकडून अनुदान लुट? – सत्यशोधक समितीचा अहवाल गायब!
शेतीला वीजपुरवठ्याच्या नावाखाली चुकीचा हिशेब लावून सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान घेतले जात असल्याचा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला.
एमईआरसीने ५०० फीडरवर मीटर बसवले होते. त्यातून शेतीला किती वीज जाते, हे स्पष्ट झाले. पण, सत्यशोधक समितीचा अहवाल आजपर्यंत टेबल करण्यात आलेला नाही, यावरही त्यांनी आवाज उठवला.
पश्चिम महाराष्ट्रातील पाणीपुरवठा संस्था कर्ज काढून शेतीसाठी पाणी योजना राबवत आहेत. मात्र, या संस्थांना सवलतीपासून वगळले जात आहे, यावर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
१०० नंतरचं काय?" – सतेज पाटील यांचा थेट सवाल...
|