बातम्या

शिरढोण ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहारावर कारवाई कधी? ७ महिन्यांपासून अहवाल धूळखात!

When will action be taken against the irregularities


By nisha patil - 11/25/2026 3:49:24 PM
Share This News:



शिरढोण ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहारावर कारवाई कधी? ७ महिन्यांपासून अहवाल धूळखात!

तारा न्यूज प्रतिनिधी संजय गायकवाड शिरढोण ग्रामपंचायतीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाईस विलंब होत असल्याने भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सातगोंडा उर्फ पोपट पुजारी आक्रमक झाले आहेत. १५ व्या वित्त आयोगाचा निधी, घरफाळा व पाणीपट्टी वसुली तसेच खर्चातील अनियमिततेबाबत चौकशी होऊन अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर झाले आहेत. मात्र, सात ते आठ महिने उलटूनही दोषींवर कारवाई झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून वसूलपात्र रक्कम वसूल करण्याच्या मागणीसाठी पुजारी हे ३० नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. मागण्यांची पूर्तता न झाल्यास ७ डिसेंबरपासून शिरढोणच्या छत्रपती शिवाजी चौकात आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन आता काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

 


शिरढोण ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहारावर कारवाई कधी? ७ महिन्यांपासून अहवाल धूळखात!
Total Views: 28