विशेष बातम्या
108 कोटी कुठे गेले? हिशेब द्या : भारती पवार
By nisha patil - 7/18/2025 4:52:15 PM
Share This News:
108 कोटी कुठे गेले? हिशेब द्या : भारती पवार
सतेज पाटील यांची थेट पाईपलाईन योजना यशस्वी; तरीही विरोधकांकडून खोटे आरोप?
कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आज महापालिकेच्या कारभारावर व प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "चांगल्या योजनांचं श्रेय विरोधक घेतात आणि वाईट घडलं की काँग्रेसवर आरोप करतात, ही सवय झाली आहे."
सतेज (बंटी) पाटील यांनी 2009 पासून थेट पाईपलाईन योजनेसाठी केलेले प्रयत्न, निधी मिळवून योजना महापालिकेकडे सुपूर्त केल्याचे दाखले देत, त्यांच्यावर खोटे आरोप थांबवावेत, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, शहरातील महिलांसाठी स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, उद्योजक सुनील बोडके यांच्या स्वयंचलित शौचालय प्रस्तावाला मिळालेला नकार, तसेच महापालिकेतील 108 कोटींच्या निधीबाबत अपारदर्शकता यावरूनही प्रशासनावर सडकून टीका करण्यात आली.
108 कोटी कुठे गेले? हिशेब द्या : भारती पवार
|