बातम्या
जिथे विज्ञान हतबल होते, तिथे अध्यात्म सोबत करते; एन.एस. पाटलांचे प्रतिपादन
By nisha patil - 9/24/2026 3:40:21 PM
Share This News:
जिथे विज्ञान हतबल होते, तिथे अध्यात्म सोबत करते; एन.एस. पाटलांचे प्रतिपादन
प्रतिनिधी अजित बोडके - विज्ञानाला मर्यादा आहेत, मात्र अध्यात्म अनंत आणि अमर्याद आहे. जिथे विज्ञान हतबल होते, तिथे अध्यात्म माणसाला साथ देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा महात्मा फुले जन आरोग्य जिल्हा तक्रार निवारण समितीचे सदस्य एन.एस. पाटील यांनी केले. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या बैठकीत ते बोलत होते.
इंटरनेट आणि आयफोनच्या युगात जग मुठीत आले असले, तरी माणूस कुटुंबापासून आणि समाजापासून दुरावत चालला आहे. गाठीभेटी कमी होत असून, अनेकजण एकाकीपणाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत अध्यात्म, सत्संग आणि भगवंत भक्तीच जीवनाला समाधान आणि योग्य दिशा देऊ शकते, असे एन.एस. पाटील यांनी सांगितले.
ज्येष्ठांनी व्यसनांपासून दूर राहून सत्संग, मंदिरे आणि तीर्थस्थळांना भेटी द्याव्यात. निःस्वार्थी भगवंत भक्तीतून मानसिक समाधान मिळते आणि उर्वरित आयुष्य सार्थकी लागते, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष कावजी कदम होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिथे विज्ञान हतबल होते, तिथे अध्यात्म सोबत करते; एन.एस. पाटलांचे प्रतिपादन
|