बातम्या
शिवसेना कोणाची? अंतिम फेरी २० ऑगस्टला!
By nisha patil - 7/15/2025 12:20:05 PM
Share This News:
शिवसेना कोणाची? अंतिम फेरी २० ऑगस्टला!
स्थानिक निवडणुकीपूर्वी निकाल येणार का? – राजकीय वर्तुळात उत्सुकता
शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी पार पडली. यावेळी न्यायालयाने “या प्रकरणाची अंतिम सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेण्यात येईल” असे स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात २० ऑगस्ट ही संभाव्य तारीख नमूद करण्यात आली असून, नेमकी सुनावणी याच दिवशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असताना, या निर्णयाचा थेट राजकीय परिणाम होणार असल्याने सर्व पक्षांचे लक्ष आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.
शिवसेना कोणाची? अंतिम फेरी २० ऑगस्टला!
|