विशेष बातम्या
थेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता?
By nisha patil - 10/18/2025 3:21:51 PM
Share This News:
थेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता?
राजेश क्षीरसागर यांचा सतेज पाटील यांच्यावर पलटवार
थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय घेताना जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आमदार सतेज पाटील करत असल्याचा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. २०१२ मध्ये योजनेस मान्यता आणि २०१३ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले, तेव्हा सतेज पाटील पालकमंत्री आणि काँग्रेस सत्तेत होती, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
पाणीपुरवठा वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचे पाटील सांगत असले तरी त्यांनी सत्तेत असताना ती सुधारली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “महायुती सरकार जनतेच्या कामासाठी कटिबद्ध आहे, आणि आम्ही अधिकारी वर्गावर वचक ठेवत आहोत, म्हणूनच माजी पालकमंत्र्यांना पोटशूळ उठली आहे,” असे क्षीरसागर म्हणाले.
थेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता?
|