बातम्या
🚨 सासूरवाडीतून परतताना पत्नीचा निघृण खून; संशयित पती फरार
By nisha patil - 9/30/2025 11:03:49 AM
Share This News:
पेठवडगाव (ता. हातकणंगले) : सासरहून पत्नीला घेऊन येत असताना पतीनेच रस्त्यात तिचा हातोडा आणि कोयत्याच्या वारांनी निघृण खून केला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री पेठवडगाव–कोरेगाव रस्त्यावर घडला.
🔹 मृत महिला – रोहिणी प्रशांत पाटील (२९)
🔹 संशयित – प्रशांत मारुती पाटील (३४, रा. भादोले)
मोटारसायकल थांबवून पतीने वार केल्यानंतर पत्नीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी घरी परतून वडिलांना “पत्नीचा खून केला” असे सांगून पसार झाला.
पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी कोयता, हातोडा आणि चटणीची पुडी जप्त केली. मोबाईल फॉरेन्सिक लॅबने पंचनामा केला असून, मृतदेह नवे पारगाव आरोग्य केंद्रात हलवण्यात आला आहे.
परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली असून, संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
🚨 सासूरवाडीतून परतताना पत्नीचा निघृण खून; संशयित पती फरार
|