बातम्या

आजरा येथे संवेदना फाऊंडेशनतर्फे रानभाजी महोत्सव उत्सहात साजरा

Wild Vegetable Festival


By nisha patil - 1/9/2025 12:55:33 PM
Share This News:



आजरा येथे संवेदना फाऊंडेशनतर्फे रानभाजी महोत्सव उत्सहात साजरा

 

आजरा(हसन तकीलदार)-: संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या वतीने पं. दीनदयाळ विद्यालय येथे रानभाजी पाककृती स्पर्धा व रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात स्थानिक शेतकरी, गृहिणी, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.


रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात वक्ते डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या हस्ते झाले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, "मानवी जीवनात रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी उपयोग अमूल्य आहेत. बदलत्या जीवनशैलीत आहारात ऋतुमानानुसार रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे."


स्पर्धेत सहभाग व आकर्षण
रानभाजी पाककृती स्पर्धेत तब्बल ४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच नव कृष्णा व्हॅली स्कूल, उत्तूरच्या विद्यार्थ्यांनी रानभाजी रोपांचे माहितीपर प्रदर्शन भरवून उपस्थितांचे लक्ष वेधले.


 स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे आहेत.
प्रथम क्रमांक – सौ. शुभांगी धनाजी राणे (वेळवट्टी)

द्वितीय क्रमांक – श्रीमती. नंदा सदाशिव सावंत (गारगोटी)

तृतीय क्रमांक – सौ. प्रियांका मोहन पायरेकर (आजरा)

चतुर्थ क्रमांक – सौ. मीरा गंगाराम हरेर (हात्तिवडे)

पाचवा क्रमांक – सौ. विमल दशरथ कसेकर (दर्डेवाडी)


उत्तेजनार्थ पुरस्कार सौ. वर्षा कृष्णा होडगे (यमेंकोड), सौ. सरिता बाळासाहेब पाटील (सरोळी) व सौ. सुगंधा परशराम हरळकर (चाफवडे) यांना देण्यात आले.
विजेत्यांना सन्मानचिन्ह, गृहोपयोगी भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात आले.


  कार्यक्रमाला  म्हाळसाकांत देसाई (नायब तहसीलदार, आजरा), डॉ. सुधीर मुंज (अध्यक्ष, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था),  भुषण पाटील (तालुका कृषी अधिकारी), संजीव देसाई (प्राचार्य, पं. दीनदयाळ विद्यालय), मा. रामकृष्ण मगदूम (प्राचार्य, नव कृष्णा व्हॅली स्कूल, उत्तूर) आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संवेदना फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. आण्णाप्पा पाटील होते.  


या स्पर्धेसाठी श्री. मोहन माने (रानभाजी अभ्यासक), अ‍ॅड. एम. ए. पाटील,  ढवळ सर, सौ. धनश्री देसाई व शुभांगी निर्मळे मॅडम परीक्षक म्हणून उपस्थित होते. तर योगेश शिंदे, श्रीकांत कळसकर, पांडुरंग पाटील, संजय भोसले, मॅकवीन फर्नांडिस यांचे विशेष सहकार्य लाभले.


संवेदना निसर्गमित्र टीमचे गिरीधर रेडेकर, अमोल रेडेकर, महेश पाटील, सिद्धेश गिलबिले, रमेश सावंत, कृष्णा खाडे,युवराज पाटील, अमर पाटील, अश्विन हरेर, तानाजी खाडे, श्रीतेज कवळेकर, अरूण घाटगे, फिलीप रॉड्रिंक्स, सौ. गिताताई पोतदार व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संतराम केसरकर यांनी केले तर आभार  गिरीधर रेडेकर यांनी मानले.


सामाजिक बांधिलकी, पोषणमूल्यांचा जागर व आरोग्यपूरक आहाराचा संदेश देणारा संवेदना फाऊंडेशन आजरा आयोजित रानभाजी महोत्सव हा उपक्रम आजर्यातील एक संस्मरणीय सोहळा ठरला.


आजरा येथे संवेदना फाऊंडेशनतर्फे रानभाजी महोत्सव उत्सहात साजरा
Total Views: 60