विशेष बातम्या
केखलेत वन्यप्राण्यांचा हैदोस
By nisha patil - 6/23/2025 7:43:08 PM
Share This News:
केखलेत वन्यप्राण्यांचा हैदोस :
ऊस-भात-भुईमूग पिकांची मोठी हानी, शेतकऱ्यांचा उद्रेक
पन्हाळा तालुक्यातील केखले परिसरात रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी संदीप सर्जेराव पाटील यांच्या 'गणेश बाग' शिवारातील १४ गुंठे ऊस, ५ गुंठे भात आणि ६ गुंठे भुईमूग पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे.
या भागात जोतिबा व गिरोली घाट परिसरातून गवे, रानडुकरे, साळींदर आणि तरस यांसारखे वन्यप्राणी वारंवार शेतांमध्ये घुसून पिकांची नासधूस करत आहेत. सततच्या हानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
सोमवारी (ता.२३) शेतकरी वन विभागाला निवेदन देणार असून, जर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
केखलेत वन्यप्राण्यांचा हैदोस
|