बातम्या

न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल येथे रानभाज्यांचे प्रदर्शनाचे आयोजन

Wild vegetable exhibition organized


By nisha patil - 9/13/2025 3:36:09 PM
Share This News:



न्यू  मॉडेल  इंग्लिश  मीडियम  स्कूल येथे रानभाज्यांचे  प्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर दि. 13 : विवेकानंद कॉलेज (अधिकार प्रदत्त स्वायत्त) येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी रानभाज्यांचे प्रदर्शन या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आयोजीत करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा समावेश करण्यात आला होता या उपक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. प्राचार्यां  शुभांगी गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या निमित्ताने मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की रानभाजी हा स्थानिक आहारातील महत्त्वाचा घटक असून यामध्ये पोषण मूल्य आणि औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळतो विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या माध्यमातून या परंपरेचे जतन करणे गरजेचे आहे प्रदर्शनात कुर्डू ,पात्री, शेवगा, तांदळी, घोळ, आंबुशी, भारंगी, गोमाटी, कुडा, मोरशेंड, बांबू कोंब, कपाळ फोडी, गुळवेल, हाडसांधी, नाल, शतावरी, मायाळू, कोर्टा तसेच कर्टुले अशा 60 पेक्षा अधिक रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले होते.या भाज्यांचे औषधी गुणधर्म पोषण मूल्य वापराच्या पद्धती व पाककृती यांची माहिती माहिती फलकाद्वारे देण्यात आली होती.

वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी.टी.दांगट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अशा उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन स्थानिक ज्ञानाचे जतन व जैवविविधतेचे महत्त्व आढळून अधोरेखित होते असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संयोजन विभागातील प्राध्यापकानी केले. प्रदर्शनाचा लाभ शाळेतील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना झाला.


न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल येथे रानभाज्यांचे प्रदर्शनाचे आयोजन
Total Views: 97