विशेष बातम्या
गोकुळचा संकल्प: २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठणार!
By Administrator - 7/28/2025 12:55:39 PM
Share This News:
गोकुळचा संकल्प: २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठणार!
चेअरमन नविद मुश्रीफ यांचा पुढाकार, २० हरियाणवी म्हशींची खरेदी
गोकुळ दूध संघाने २५ लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला असून यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी स्वतः पुढाकार घेत हरियाणामधून २० मुऱ्हा जातीच्या म्हशी खरेदी केल्या. त्यांच्या शेतातील गोठ्यात एकूण ५४ जनावरे आहेत.
दूधवाढीसाठी उत्पादकांना ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यावेळी विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. नविद मुश्रीफ यांच्या या कृतीशील नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोकुळचा संकल्प: २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठणार!
|