बातम्या

नवरात्री उत्सवापर्यंत तरी गरुड मंडप पूर्ण होईल का?

Will the Garuda Mandap be completed at least by the time of the Navaratri festival


By nisha patil - 2/10/2026 11:58:10 PM
Share This News:



नवरात्री उत्सवापर्यंत तरी गरुड मंडप पूर्ण होईल का?

 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या रटाळ व ढिसाळ कारभारा बाबत 
 

कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सचिवांना निवेदन 

अत्यंत मोठा गाजावाजा करत कोट्यावधी रुपयाची घोषणा करत तुटपुंजा रकमेवर बोळवण करत आज महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडाचा गवगवा करत शासनाने त्याचं काम सुरू केलं. अनेक वादग्रस्त प्रकरणे त्यात जुन्या मूर्तींची पुनर्स्थापना,तसेच जुने दगड घासणे काढणे,त्याला दिलेली व्हायब्रेशन्स अशा गोष्टीमुळे अनेक ठिकाणी,टीकेला तसेच अनेकांच्या रोषाला कारणीभूत ठरलेले अंबाबाईचे भक्त अनेक अडीअडचणींना तोंड देत दर्शन घेता आहेत.

गरूड मंडप  कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेचा साक्षीदार आहे.पण निव्वळ तांत्रिकदृष्ट्या सक्षमता नसल्यामुळे अनेक वेळेला गरुड मंडपाचं झालेलं काम उतरावं लागलं. या आपल्या देशामध्ये खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रसिद्ध असणारा किरणोत्सव या गरुड मंडपातूनच होतो. लक्षावधी खगोलप्रेमींना तसेच भाविकांना पर्वणी असणारा हा किरणोत्सव म्हणजे एक शास्त्रीय परंपरेचा अद्वितीय नमुना आहे. दरवर्षी गरुड मंडपात पुनस्थापित होणारा गणपती तर गेली कित्येक वर्ष बाहेरच आहे.
 

  मात्र "जगतजननी अंबाबाई " जे भारतातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान आणि आमच्या कोल्हापूरचे वैभव आहे त्या महालक्ष्मीची मूर्ती सुद्धा,या गरुड मंडपाच्या अपूर्ण कामकाजामुळं नवरात्री मध्ये गरुड मंडपात सुस्थापित होत नाही. हे दुर्दैव आहे.
   

या निवेदनाद्वारे आम्ही देवस्थान समितीला सुचित करू इच्छितो की,
देव, देश,आणि धर्म याबाबतीत कुठलेही राजकारण न आणणे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची परंपरा व ठाकरे घराण्याची संस्कृती आहे. मा शिवसेनाप्रमुख कै हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं करवीर निवासिनी अंबाबाई हे तर आराध्य दैवत होतं. पक्षप्रमुख उद्धवजी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची ही पुज्यभूमी व अंबाबाईची पुण्यभूमी म्हणून कोल्हापूरला नतमस्तक होत असतात.

 

    या नवरात्रमध्ये जर गरुड मंडपामध्ये काम पूर्ण होऊन अंबाबाईची पालखी अथवा अंबाबाई ची मूर्ती ठेवण्याची व्यवस्था जर शासन करू शकत नसेल तर मात्र कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जनआंदोलन उभारावा लागेल. शासनाच्या निवळ वेळकाढू  धोरणामुळे व कंत्राटदाराच्या चुकीच्या भूमिकांच्या मुळे जर आमच्या देव-देवतांच्या बाबतीत शासनाच्या आडमुठी पणाच्या भूमिकेमुळ अडचण होत असेल तर,आम्हाला या गरूड मंडपाच्या रेंगाळलेल्या कामाबद्दल
जण -आंदोलन करावं लागेल. याची नोंद घ्यावी..

 

 या मागणीचे निवेदन आज देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांना देण्यात आले, हे निवेदन शिवसेना शहरप्रमुख युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले, यावेळी सचिव यांनी आमच्या कडून उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तसेच आम्ही नवरात्री च्या अगोदर सर्व काम पुर्ण करू असे आश्वासन दीले यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख विराज पाटिल, शहर प्रमुख मंजित माने, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे,शुभांगी साळोखे, पपू नाईक, महादेव कोकडे,संजय जाधव,दीपाली शिंदे, सानिका दामूगडे, अक्षय घाटगे, शौनक भिडे,तृप्ती विभुते,ऋषिकेश जोशी,सुनिल जोशी, धनंजय मेहंद्रकर अभिशेक दाबाडे,कनिष्क शिंदे, रुपेश रोडे, आकाश शिंदे, राजवर्धण झाबरे, रणजित आयरेकर आदी,

 


नवरात्री उत्सवापर्यंत तरी गरुड मंडप पूर्ण होईल का?
Total Views: 9