राजकीय

महापालिका निवडणुका जाहीर होणार? 15 ते 17 डिसेंबरदरम्यान घोषणेची शक्यता...

Will the municipal elections be announced


By nisha patil - 3/12/2025 1:49:46 PM
Share This News:



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील अनिश्चिततेला अखेर तोडगा निघण्याचे संकेत मिळत आहेत. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होत असतानाच आता राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

निवडणूक आयोगाने तयारीला वेग देत संभाव्य तारखांवर विचार सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार 15 ते 17 डिसेंबरदरम्यान महापालिकांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा होऊ शकते.

राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांवर आरक्षण मर्यादेचा पेच अद्याप कायम आहे. 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण असलेल्या 17 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे. त्यामुळे आयोगाला वेळापत्रकात मोठे बदल करावे लागले आहेत. कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने, सर्वात व्यवहार्य पर्याय म्हणून महापालिका निवडणुका आधी घेण्याचे नियोजन सुरू आहे.

या संभाव्य वेळापत्रकात बहुप्रतिक्षित मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूकही याच कालावधीत जाहीर होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात येणाऱ्या काही दिवसांत मोठी राजकीय हलचल पाहायला मिळणार आहे.


महापालिका निवडणुका जाहीर होणार? 15 ते 17 डिसेंबरदरम्यान घोषणेची शक्यता...
Total Views: 18