बातम्या
ऊस दराचा तिढा सुटणार की रेल्वे रोको होणार? राजू शेट्टींचा इशारा!
By nisha patil - 11/27/2026 3:13:59 PM
Share This News:
ऊस दराचा तिढा सुटणार की रेल्वे रोको होणार? राजू शेट्टींचा इशारा!
ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, ऊस दराबाबत बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्या सकाळी ११ वाजता राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत ऊस दराचा प्रश्न मार्गी लागणार की उद्या रेल्वे रोको आंदोलन होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ऊस दराचा तिढा सुटणार की रेल्वे रोको होणार? राजू शेट्टींचा इशारा!
|