बातम्या
विवेकानंद कॉलेज : विद्यार्थ्यांमधील क्षमतांना बळकट करणारे समृद्ध व्यासपीठ -विंग कमांडर गजानन हरळीकर
By nisha patil - 1/12/2025 4:06:24 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज : विद्यार्थ्यांमधील क्षमतांना बळकट करणारे समृद्ध व्यासपीठ -विंग कमांडर गजानन हरळीकर
कोल्हापूर दि. 1: शिक्षण विभागाने घालून दिलेल्या अभ्यासक्रमांच्या आकलणासोबत आपल्यातील सुप्त क्षमताना व्यासपीठ देऊन त्या करिअरच्या संधीमध्ये रूपांतरित करण्यासाठीचे ज्ञान केंद्र म्हणजे विवेकानंद कॉलेज आहे. . कॉलेजमधील आणि उपलब्ध असणाऱ्या सुविधा या आपल्या अंतर्गत मुलांना गतिमान करून स्पर्धेच्या युगात अस्तित्व टिकविण्याची संजीवनी देते. असे मत विंग कमांडर गजानन हरळीकर वरिष्ठ अधिकारी भारतीय वायुसेना यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मत मांडले. विद्यार्थी सक्षमीकरण आणि करिअर समुपदेशन या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
रोजगाराच्या उपलब्ध संधी, सरकारी नोकऱ्यांमधून मिळणारी प्रतिष्ठान आणि व्यावसायिक शिक्षणाची दर्पण यामधून पारंपारिक शिक्षणात प्रवास करत असताना आपल्या ऊर्जेचा संयोग साधून यश प्राप्ती करण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे असेही त्यांनी मार्गदर्शन भाषणात नमूद केले . विवेकानंद कॉलेज हे पारंपारिक शिक्षणातील अग्रक्रमाने येणारे असले तरी येथील शिक्षणाची आणि यशाची गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या समर्पण भावनेने तयार झाली आहे असे प्रा सुदर्शन शिंदे ज्युनिअर सायन्स विभाग स्टाफ सेक्रेटरी यांनी महाविद्यालयाच्या वतीने स्वागतपर भाषणात आपले मत मांडले. या कार्यक्रमासाठी श्री चेतन माने सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्राम भाग सांगली हे उपस्थित होते .
सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी केले . आभार प्रा किशोर गुजर यांनी मांडले तर सूत्रसंचालन प्रा एल.एस. नाकाडी यांनी केले . कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , संस्था सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, प्रा गीतांजली साळुंखे, प्रा सौ शिल्पा भोसले प्रा. मुकुंद नवले, प्रा किशोर गुजर, प्रा हेमंत पाटील, .मेजर सुनिता भोसले, आय.क्यू.ए.सी.प्रमुख डॉ. श्रुती जोशी, कर्नल मानस दीक्षित, कर्नल विक्रम नलावडे, कार्यालयीन कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले .
विवेकानंद कॉलेज : विद्यार्थ्यांमधील क्षमतांना बळकट करणारे समृद्ध व्यासपीठ -विंग कमांडर गजानन हरळीकर
|