बातम्या
शाही दसरा महोत्सवात विजेत्यांचा सन्मान; पुढील महोत्सवासाठी तयारीला सुरुवात — जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 10/17/2025 6:17:28 PM
Share This News:
शाही दसरा महोत्सवात विजेत्यांचा सन्मान; पुढील महोत्सवासाठी तयारीला सुरुवात — जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, दि. १७ : राज्यस्तरीय दर्जा मिळालेल्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात विविध स्पर्धांतील विजेत्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी येडगे यांनी येणाऱ्या महोत्सवासाठी आतापासून नियोजन सुरू करण्याचे आवाहन केले. सीईओ कार्तिकेयन एस. यांनी दसरा महोत्सवाला राज्यस्तरीय मान्यता मिळवून देणाऱ्या प्रयत्नांबद्दल जिल्हाधिकारींचे आभार मानले.
समारंभात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सचिन शानबाग, आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड, तानाजी सावंत, रोहित तोंदले, महेश कांजर, सचिन अडसूळ, अनिल यमकर आणि सतिश शेंडगे यांचा सन्मान करण्यात आला.
दसरा महोत्सव ट्रस्टच्या बैठकीत वर्षभर महोत्सवाशी संबंधित उपक्रम राबवण्यासाठी समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्पर्धांमध्ये वैष्णवी फाटक, श्रावणी माळी, पयोष्णी दोशी, प्रज्वल मोरे, श्रेया पाटील, क्षितीजा पोवार, चैतन्य म्हेत्रे, महेक खानजादे आदी विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
शाही दसरा महोत्सवात विजेत्यांचा सन्मान; पुढील महोत्सवासाठी तयारीला सुरुवात — जिल्हाधिकारी अमोल येडगे
|