राजकीय

नगरसेवक इच्छुक काजल कांबळे यांच्या प्रचारावर जादूटोणा; कनानगरमध्ये खळबळ

Witchcraft on the campaign of corporator aspirant Kajal Kamble excitement in Kananagar


By nisha patil - 12/21/2025 2:17:19 PM
Share This News:



कोल्हापूर :- प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या सदर बाजार, विचारे माळ, ताराबाई पार्क आणि कनानगर परिसरातून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार सौ. काजल बाबासो कांबळे यांच्या प्रचारावर धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. 

त्यांच्या प्रचाराच्या जाहिरातीवर जादूटोणा अथवा करणी केल्याचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला आहे.कनानगर परिसरातील चर्चसमोर लिंबूला टाचण्या टोचून त्यावर हळद-कुंकू लावलेले आढळून आले.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकार हा सौ. काजल कांबळे यांच्या प्रचाराला अडथळा आणण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


नगरसेवक इच्छुक काजल कांबळे यांच्या प्रचारावर जादूटोणा; कनानगरमध्ये खळबळ
Total Views: 48