बातम्या
आग्रामधील महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या
By nisha patil - 11/30/2025 11:45:56 AM
Share This News:
उत्तर प्रदेशातील अलीगड येथे एका 32 वर्षीय महिला कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हेमलता असे नाव असलेल्या या महिला पोलिसांनी मृत्यूपूर्वी काही वेळ आधीच आपल्या WhatsApp स्टेटसवर “मला माफ करा” असा संदेश टाकला होता.
हा स्टेटस पाहून एका सहकारी कॉन्स्टेबलने तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली, परंतु पोलिस जेव्हा त्यांच्या भाड्याच्या खोलीत पोहोचले तेव्हा हेमलता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हेमलता रोरावर पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या आणि अलीगडच्या जवाहर नगर भागात एकट्याच राहत होत्या.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेने कुटुंबावर शोककळा उमटली असून मृत्यूपूर्वी अवघ्या दोन तास आधीच हेमलताने आपल्या वडिलांना फोन करून सुट्टी मिळाल्याची तसेच चुलत बहिणीच्या लग्नाला जाण्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. चार भावंडांमध्ये सर्वात धाकटी असलेल्या हेमलताच्या लग्नाची तयारी सुरू असताना तिने अशी टोकाची पावले उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
या घटनेतून पुन्हा एकदा पोलिस कर्मचारी, विशेषत: महिला कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताण, कामाचा दबाव आणि भावनिक आरोग्य या विषयांवर गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
आग्रामधील महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या
|