राजकीय

महिला व बालकल्याण सभापती निशात चांद यांचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर

Women and Child Welfare Chairman Nishat Chand home is a threat to the ruling party


By Administrator - 2/27/2026 2:33:20 PM
Share This News:



महिला व बालकल्याण सभापती निशात चांद यांचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर


  आजरा (हसन तकीलदार) :- आजरा नगरपंचायतीतील प्रशासकिय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बाबतची खदखद बाहेर काढत सत्ताधारीतील महिला व बालकल्याण सभापती सौ. निशात चांद यांनी सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर दिला आहे. एकूणच नगरपंचायतीच्या कारभाराविषयी आणि निधीच्या विनियोगाविषयी शंका व्यक्त करीत मनातील खदखद आमच्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केली आहे.
    ज्या ठिकाणी गरज नाही, जेथे आवश्यकता नाही अशा ठिकाणी लाखो रुपयांचा निधी खर्च करून रस्ते,गटारी तयार केल्या जात आहेत. साबाज फार्म हाऊस सारख्या ठिकाणी लोकवस्ती नसतानाही तेथे लाखो रुपयांचा निधी खर्चून रस्ता तयार केला आहे. साई कॉलनी सारख्या लोकवस्ती असलेल्या ठिकाणी मात्र दुर्लक्ष केले जात आहे. जेथे पाण्याचा निचरा व्यावस्थित होत नाही अशा ठिकाणी गटर्स बांधले जात आहेत. परंतु ज्या कॉलनीमध्ये गटारांची आवश्यकता आहे तेथे दुर्लक्ष होत आहे. नगरपंचायत निधीचा वापर अयोग्य पद्धतीने करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आहे.नगरसेवकांनाच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेला यांच्याकडून सन्मानजनक वागणूकिची अपेक्षा कशी होणार? नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. कामासंबंधित नगरपंचायतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. निधीचा चुराडा न करता योग्य नियोजन आणि निधीचा वापर केला पाहिजे. अंदाज पत्रकाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष सभेची आदल्या दिवशी रात्री माहिती देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. बांधकाम परवान्याबाबत अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाहीत, वेळेत परवाना मिळत नाही म्हणून लोकं विपरवाना बांधकाम करीत आहेत. केवळ सभेमध्ये गोड बोलून वेळ मारून नेतात परंतु सभा संपल्यानंतर त्यांच्याकडून मिळणारी वागणूक विचार करायला भाग पाडत आहे अशी चिंता व्यक्त केली. अल्पसंख्यांकाकरिता असणाऱ्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे त्यासाठी माझा प्रयत्न निश्चितच राहणार आहे. असे आरोप करीत नगरसेविका निशात चांद यांनी बोलताना सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या या पावित्र्यामुळे नगरपंचायत कारभारामध्ये सुधारणा होणे गरजेचे असल्याचे सिद्ध होत आहे.


महिला व बालकल्याण सभापती निशात चांद यांचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर
Total Views: 371