विशेष बातम्या
महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन कुटुंब सक्षम करावे – सौ. अरुंधती महाडिक यांचे आवाहन
By nisha patil - 7/6/2025 10:18:33 PM
Share This News:
महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन कुटुंब सक्षम करावे – सौ. अरुंधती महाडिक यांचे आवाहन
वाशी (ता. करवीर) | “राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून विविध उद्योग उभारावेत आणि आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे,” असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी केले.
करवीर तालुक्यातील वाशी येथे बांधकाम कामगारांना भांडी संच व गॅस सिलेंडर वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष रानगे यांच्या प्रयत्नातून शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.
सौ. महाडिक यांनी महिलांना स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देत, शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच महिला आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी भोगावती कारखान्याचे संचालक बी. ए. पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे, रोहिणी पाटील, सारिका रानगे, अमोल पाटील, कृष्णात पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन कुटुंब सक्षम करावे – सौ. अरुंधती महाडिक यांचे आवाहन
|