बातम्या
*पोळगाव ता. आजरा येथे बौद्ध सभेच्यावतीने महिला शिबीर संपन्न
By nisha patil - 9/18/2026 6:31:10 PM
Share This News:
*पोळगाव ता. आजरा येथे बौद्ध सभेच्यावतीने महिला शिबीर संपन्न
*आजरा(हसन तकीलदार ):-पोळगाव ता. आजरा येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृती दिनाचे औचित्य साधून महिला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयावरती चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.
सुरवातीला बौद्धाचार्य भिकाजी कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वाती पाटील यांनी संविधानात बाबासाहेबांचे विशेष तसेच हिंदू कोड बिल या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. दक्षिणचे माजी अध्यक्ष एस. व्ही. आईनीकर यांनी बुद्ध आणि धम्म या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. सेक्युलर मूव्हमेंटचे जिल्हाध्यक्ष अजय देशमुख यांनी समता, न्याय आणि बंधुता यावर बाबासाहेबानी आपल्याला कोणती मूल्ये दिली यावर मार्गदर्शन केले
यावेळी जिल्हा सचिव संजय कांबळे, रवींद्र कांबळे (भुदरगड ता. अध्यक्ष),सुशीलकुमार प्रज्ञावंत, सर्जेराव कांबळे, कॉ. शांताराम मोरे, संदीप कांबळे, धनाजी कांबळे, के. वाय. धम्मरक्षित, शिवाजी सम्राट, मंगल कांबळे, शेवाळे मॅडम, शोभा कांबळे, यांचेसह अनेक महिला उपासक आदिजण उपस्थित होते. अध्यक्ष जीवन शेवाळे यांनी आभार मानले.
*पोळगाव ता. आजरा येथे बौद्ध सभेच्यावतीने महिला शिबीर संपन्न
|