बातम्या
महिलांचे आरोग्य कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे – नवोदितादेवी घाटगे
By nisha patil - 6/13/2025 3:23:30 PM
Share This News:
महिलांचे आरोग्य कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे – नवोदितादेवी घाटगे
कागल येथे राजे फाउंडेशन, राजमाता जिजाऊ महिला समिती आणि संकल्पसिद्धी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राजे बँकेच्या व महिला समितीच्या अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे म्हणाल्या, “धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य जपण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत.”
शिबिरात डॉ. शीतल देसाई यांनी मासिक पाळी, गर्भधारणा, स्तनपान व रजोनिवृत्ती अशा टप्प्यांतील आरोग्यविषयक गरजांवर मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांना संतुलित आहार घेण्याचे व जंकफूड टाळण्याचे आवाहन केले.
या उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्यासपीठावर नम्रता कुलकर्णी व जयश्री कोरवी उपस्थित होत्या.
महिलांचे आरोग्य कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे – नवोदितादेवी घाटगे
|