ताज्या बातम्या
नैसर्गिक शेतीत महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान – आत्मा उपसंचालक रवींद्र तागड यांचे प्रतिपादन
By nisha patil - 5/19/2025 4:55:09 PM
Share This News:
नैसर्गिक शेतीत महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान – आत्मा उपसंचालक रवींद्र तागड यांचे प्रतिपादन
कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे १३ ते १७ मे दरम्यान आयोजित ‘सखी प्रशिक्षण कार्यक्रमात’ कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना नैसर्गिक शेतीचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. “नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून, यातून स्वावलंबन व पर्यावरणपूरक शेतीस चालना मिळते,” असे आत्मा कोल्हापूरचे उपसंचालक रवींद्र तागड यांनी सांगितले.
या प्रशिक्षणात जैव निविष्ठा, सेंद्रिय कर्ब, कीड व रोग व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्यांची माहिती आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यांचा समावेश होता. कार्यक्रमात पाच तालुक्यांतील महिला शेतकरी सहभागी झाल्या.
नैसर्गिक शेतीत महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान – आत्मा उपसंचालक रवींद्र तागड यांचे प्रतिपादन
|