बातम्या

सोनार दुकानात महिलांची हातचलाखी! दागिने लंपास करणाऱ्या ३ महिलांना बेड्या

Womens tricks in a goldsmith shop


By nisha patil - 11/21/2026 1:04:37 PM
Share This News:



सोनार दुकानात महिलांची हातचलाखी! दागिने लंपास करणाऱ्या ३ महिलांना बेड्या

सोनार दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करायचा... दुकानदाराची नजर चुकवायची आणि हातचलाखीने सोन्याचे दागिने लंपास करायचे. अशाच प्रकारे चोरी करणाऱ्या तीन महिलांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. १७ नोव्हेंबर रोजी हातकणंगले येथील ओम ज्वेलर्समध्ये तीन महिलांनी खरेदीच्या बहाण्याने प्रवेश केला. यावेळी त्यांनी तब्बल ६९ हजार ७२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

या घटनेचा तपास करताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, संशयित महिला चोरीचे दागिने विक्रीसाठी कोल्हापुरातील टेंबलाई नाका परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सलीमबी पठाण, सोनिया पवार आणि माया परदेशी या तिघींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचे ८.७१५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.


सोनार दुकानात महिलांची हातचलाखी! दागिने लंपास करणाऱ्या ३ महिलांना बेड्या
Total Views: 18