बातम्या
वॉर्ड 15 मधील चराटी व आपटे कॉलनीतील रस्तेकामाचे शुभारंभ
By nisha patil - 3/14/2026 8:20:55 PM
Share This News:
**वॉर्ड 15 मधील चराटी व आपटे कॉलनीतील रस्तेकामाचे शुभारंभ*
**आजरा(हसन तकीलदार)*:- नाम.पालकमंत्री प्रकाश अबीटकर यांच्या आजरा विकास निधीतून आजरा नगरपंचायत वार्ड क्र. १५ मधील चराटी कॉलनी व आपटे कॉलनी येथे रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन वार्ड क्र. १५ चे नगरसेवक व आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी अजीत तोडकर सर, महेश शेटगे सर , मारुती मोहिते, अभिजीत संकपाळ , रूपेश परीट, कुतीनो काजमील, जोतीबा आजगेकर, सुरज डोंगरे आदी मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कामामुळे परिसरातील नागरिकांनी आपल्या भागातील रस्त्याच्या प्रश्नाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करत नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांनी सांगितले की, “सदर रस्त्याच्या कामावर माझे लक्ष राहील. कामाच्या दर्जात कोणतीही कुचराई आढळल्यास नागरिकांनी त्याकडे लक्ष ठेवून त्वरित माझ्या निदर्शनास आणून द्यावे. त्यावर तात्काळ सुधारणा करण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.त्याच प्रमाणे दर्जेदार काम करणेबाबत सबंधिताना सूचना केल्या.
वॉर्ड 15 मधील चराटी व आपटे कॉलनीतील रस्तेकामाचे शुभारंभ
|