राजकीय
८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण या सूत्राने प्रभाग विकासासाठी काम करा : आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 1/23/2026 4:05:17 PM
Share This News:
८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण या सूत्राने प्रभाग विकासासाठी काम करा : आमदार राजेश क्षीरसागर
शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार; महापालिकेत गट स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवले असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार जनसेवेतून प्रभाग विकासासाठी काम करण्याचे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना केले.
शिवालय, शनिवार पेठ येथील शिवसेना जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापालिकेत अधिकृत गट स्थापन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही आमदार क्षीरसागर यांनी दिल्या.
निवडून आल्यानंतर पदाचा उपभोग न घेता प्रत्येक नागरिकाच्या अडचणींना धावून जा. ‘नगरसेवक’ नव्हे तर ‘जनसेवक’ म्हणून लोकांच्या मनात स्थान मिळवणे हेच खरे यश असल्याचे सांगत मतदारांशी सातत्याने संवाद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण या सूत्राने प्रभाग विकासासाठी काम करा : आमदार राजेश क्षीरसागर
|