बातम्या

न्यायमंदिराला साजेस काम करा; आमदार क्षीरसागर यांचे निर्देश

Work in a manner befitting the court


By nisha patil - 4/8/2025 2:58:31 PM
Share This News:



न्यायमंदिराला साजेस काम करा;  आमदार क्षीरसागर यांचे निर्देश

सर्किट बेंचमुळे कोल्हापुराच्या विकासाला गती मिळणार...

कोल्हापूर सर्किट बेंचच्या इमारत नूतनीकरणाच्या कामाची आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाहणी केली. ही इमारत दीडशे वर्षांहून जुनी असून, न्यायालयीन इतिहासाचा वारसा आहे. त्यामुळे या कामात दर्जेदारतेला प्राधान्य द्या, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.

 सर्किट बेंचमुळे कोल्हापुराच्या विकासाला गती
१८ ऑगस्टपासून कामकाज सुरू होणाऱ्या सर्किट बेंचमुळे ८० हजार प्रलंबित खटल्यांना चालना मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यात रोजगार, सेवा व न्यायप्रक्रियेला बळकटी मिळेल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.


न्यायमंदिराला साजेस काम करा; आमदार क्षीरसागर यांचे निर्देश
Total Views: 118