आरोग्य

किणी ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच सुरू – आबिटकर

Work on Kini Rural Hospital to begin soon  Abitkar


By nisha patil - 9/16/2025 11:14:51 AM
Share This News:



किणी (ता. हातकणंगलेप्रतिनिधी किशोर  जासूद) येथील ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. घुणकी येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते यांनी घुणकी–पारगाव रस्त्यासाठी निधीची मागणी केली. यावर आबिटकर यांनी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला आमदार डाॅ. विनय कोरे, समीत कदम, विजयसिंह माने, यशवंत नांदेकर, जे. के. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


किणी ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच सुरू – आबिटकर
Total Views: 68