बातम्या
२० लाखांच्या निधीतून वाकरे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ; महेश जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन
By nisha patil - 12/12/2025 3:55:19 PM
Share This News:
२० लाखांच्या निधीतून वाकरे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ; महेश जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन
करवीर तालुका : कोल्हापूर जिल्ह्याच्या सह-पालकमंत्री मा. सौ. माधुरीताई मिसाळ यांच्या फंडातून मंजूर झालेल्या २० लाख रुपये निधीच्या सहाय्याने गगनबावडा राज्य महामार्ग ते दत्त द्वारका विद्यालय, वाकरे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन पार पडले.
या कार्यक्रमाला सरचिटणीस आनंद गुरव, नवनाथ पवार, सरपंच अश्विनी पाटील, अनिल पाटील यांसह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिकांची उपस्थिती होती.
२० लाखांच्या निधीतून वाकरे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ; महेश जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन२० लाखांच्या निधीतून वाकरे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ; महेश जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन
|