बातम्या
स्त्रीशक्तीला सन्मान व सामर्थ्य देण्याचे काम व्हावे — आमदार डॉ. विनय कोरे
By nisha patil - 10/13/2025 5:45:38 PM
Share This News:
स्त्रीशक्तीला सन्मान व सामर्थ्य देण्याचे काम व्हावे — आमदार डॉ. विनय कोरे
चंद्रिका चौहान यांना राज्यस्तरीय जीवनगौरव तर प्रा. वैशाली बुढ्ढे यांना वनशोभाश्री पुरस्काराने गौरव
वारणानगर येथे वारणा महिला उद्योग समूहाच्या माजी अध्यक्षा स्व. शोभाताई कोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त “दिव्य शोभाई स्मृतीपर्व” कार्यक्रमात राज्यस्तरीय महिला जीवनगौरव पुरस्कार चंद्रिका शंभूसिंह चौहान (सोलापूर) यांना तर वनशोभाश्री पुरस्कार प्रा. वैशाली संजय बुढ्ढे (जुने पारगाव) यांना आमदार डॉ. विनय कोरे व शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले की, “समाजात स्त्रीशक्तीला सन्मान आणि सामर्थ्य देण्याचे काम सतत होत राहिले पाहिजे.” कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा, सासू–सून जोड्यांचा सन्मान व गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला समीत कदम, आमदार अशोकराव माने, प्रतापराव पाटील, ईशानी कोरे, एच.आर. जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्त्रीशक्तीला सन्मान व सामर्थ्य देण्याचे काम व्हावे — आमदार डॉ. विनय कोरे
|