बातम्या
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 14 सरकारी वकिलांची प्रतिनियुक्ती; 18 ऑगस्टपासून कामकाजाला सुरुवात
By nisha patil - 9/8/2025 12:47:48 PM
Share This News:
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 14 सरकारी वकिलांची प्रतिनियुक्ती; 18 ऑगस्टपासून कामकाजाला सुरुवात
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 14 सरकारी वकिलांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त सरकारी वकील अपिल शाखा (रिट सेल) अॅड. प्रसन्नकुमार प्रियभूषण काकडे यांच्यासह अॅड. विकास महादेव माळी, अॅड. संजय धुंडीराज रायरीकर, अॅड. तेजस जयप्रकाश कापरे, अॅड. श्रीराम शांताराम चौधरी, अॅड. श्रीकांत हनमंतराव यादव, अॅड. आनंद सुभाष शाळगावकर, अॅड. नितीन बाबगोंडा पाटील, अॅड. पंकज पोपटराव देवकर, अॅड. अविनाश अशोक नाईक, अॅड. अश्विनी अशोक टाकळकर, अॅड. प्रियांका सुभाष राणे आणि अॅड. शुभांगी नितीन देशमुख यांचा समावेश आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या आदेशानुसार उपविधी सल्लागार-नि-उपसचिव विलास खांडबहाले यांनी या नियुक्तीचे परिपत्रक जारी केले आहे. 18 ऑगस्टपासून कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. हे सर्व सरकारी वकील सध्या मुंबई उच्च न्यायालय व संभाजीनगर खंडपीठ येथे कार्यरत असून, पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कोल्हापूर सर्किट बेंच येथे कार्यभार सांभाळणार आहेत.
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 14 सरकारी वकिलांची प्रतिनियुक्ती; 18 ऑगस्टपासून कामकाजाला सुरुवात
|