बातम्या
ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून काम करा – मुख्य अभियंता स्वप्नील काटकर
By nisha patil - 1/5/2026 1:21:31 PM
Share This News:
ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून काम करा – मुख्य अभियंता स्वप्नील काटकर
कामगार दिनी महावितरणामध्ये ६४ वीज कर्मचाऱ्यांचा गौरव
कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ तर सांगली जिल्ह्यातील २८ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समवेश
महावितरणाच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ६४ वीज कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ठ तांत्रिक कर्मचारी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता स्वप्नील काटकर व अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. येणारा काळ अधिक आव्हानात्मक असून ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून अधिक चांगले काम करावे, असे आवाहन मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले.
या कर्मचाऱ्यांची निवड ही मागील आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांची केलेले प्रशासकीय कामकाज व ग्राहक सेवा या निकषांवर आधारित निवड समितीद्वारे करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ तर सांगली जिल्ह्यातील २८ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समवेश आहे. यावेळी बोलताना स्वप्नील काटकर पुढे म्हणाले, ‘महावितरण मधील प्रत्येक घटक चांगले काम करत आहे. म्हणूनच ग्राहकांना सेवा देण्यात कोल्हापूर परिमंडल राज्यात अव्वल आहे. ग्राहक सेवा, देखभाल दुरुस्ती, स्मार्ट मीटर, थकबाकी वसुलीत, कमी होणारे वीज अपघात अशा सर्व निकषांत कोल्हापूर नेहमीच राज्यात आघाडीवर राहते. या सर्वाची नोंद म्हणून कर्मचाऱ्यांचा हा गौरव करण्यात येत आहे.
याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंता सुधाकर जाधव, म्हसू मिसाळ, दत्तात्रय भणगे, अजित अस्वले, अशोक जाधव, सागर मारुळकर, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन वरिष्ठ लिपीक संभाजी कांबळे यांनी केले. आभार उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी केले. कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी व पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ तर सांगली जिल्ह्यातील २८ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समवेश
|