बातम्या
अजितदादांच्या दौऱ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा – बाबासाहेब पाटील
By nisha patil - 8/21/2025 2:51:04 PM
Share This News:
अजितदादांच्या दौऱ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा – बाबासाहेब पाटील
कोल्हापूर, दि. २१ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोमवार दि. २५ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी केले.
राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना पाटील म्हणाले की, “कै. पी. एन. पाटील गटाच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. आगामी केडीसीसी बँक, गोकुळ दूध संघ, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा आधार मिळेल.”
ते पुढे म्हणाले की, “राहुल पाटील व राजेश पाटील या बंधुंसह सर्वच कार्यकर्त्यांना सन्मान मिळेल. जुने-नवे असा भेद न करता सर्वजण एकदिलाने काम करतील. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शब्दाचे पक्के, कार्यकर्त्यांना हृदयाशी धरणारे नेतृत्व आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे.”
बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. शितल फराटे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, बाजार समितीचे उपाध्यक्ष राजाराम चव्हाण, सुहास जांभळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक बाळासाहेब देशमुख यांनी केले, स्वागत नितीन दिंडे यांनी केले तर आभार विश्वनाथ कुंभार यांनी मानले.
अजितदादांच्या दौऱ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा – बाबासाहेब पाटील
|