बातम्या
परीखपूल परिसरात रु. २.२५ कोटींच्या कामांचा शुभारंभ
By nisha patil - 7/28/2025 6:55:33 PM
Share This News:
परीखपूल परिसरात रु. २.२५ कोटींच्या कामांचा शुभारंभ
परीख पूल उड्डाणपुलाचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार – आमदार क्षीरसागर
कोल्हापूर (दि. २८): परीखपूल परिसरात काँक्रीटीकरण व गटर्स कामाचा शुभारंभ आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झाला. रु. २ कोटी २५ लाखांचा निधी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत मंजूर झाला आहे.
यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी, परीख पूल परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा प्रश्न मिटवण्यासाठी दाभोलकर कॉर्नर ते पाचबंगला जोडणारा उड्डाणपूल प्रस्तावित असून, यासाठी त्यांनी २६ मे २०२५ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अधिकृत मागणी केल्याची माहिती दिली. लवकरच हा विषय मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
परीखपूल परिसरात रु. २.२५ कोटींच्या कामांचा शुभारंभ
|