आरोग्य
गडहिंग्लज येथे आरोग्य सहाय्यक, पर्यवेक्षकांची कार्यशाळा
By nisha patil - 1/16/2026 5:32:21 PM
Share This News:
कोल्हापूर:- सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) कार्यालय कोल्हापूर व जिल्हा हिवताप कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त माध्यमाने ग्रामीण रुग्णालय गडहिंग्लज येथे हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, माकड ताप ( K.F.D.) आजाराविषयी जिल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय स्तरावरील आरोग्य सहाय्यक / आरोग्य पर्यवेक्षक यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. कर्तस्कर, जिल्हा हिवताप अधिकारी सिंधुदुर्ग यांनी माकडताप (K.F.D.) आजाराविषयी माहिती दिली. तसेच सागर किनळेकर, किटकसमाहारक यांनी गोचीड सर्वेक्षण कसे करावे याबदद्ल सविस्तर व स्लाईड प्रेझेंटेशन (P.P.T.) च्या माध्यमातुन मार्गदर्शन केले.
घनदाट जंगले असलेल्या भागामध्ये माकडतापाचे सर्वेक्षण आरोग्य कर्मचा-यांमार्फत करण्यात यावे. मृत माकड अथवा जंगली प्राणी याबाबत त्वरीत माहिती वरिष्ठ कार्यालयास देण्यात यावी. तसेच गोचीड सर्वेक्षण आणि सर्वेक्षणातून रक्कजल नमूने विषाणू संस्था पुणे (N.I.V. पुणे) येथे पाठविण्यात यावेत. याकामी वनविभाग, पशुवैद्यकिय विभाग तमेच ग्रामपंचायत विभाग यांचे सहकार्य घेण्यात यावे. लोकांना आरोग्य शिक्षण देवून जनजागृती करण्यात यावी, असे मत डॉ. संजय रणवीर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) कोल्हापूर यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेचे आयोजक CHRI व PATH फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक डॉ. धांडे यांनी केलेले होते. याप्रसंगी डॉ. विनोद एल.मोरे जिल्हा हिवताप अधिकारी, कोल्हापूर, डॉ. रमेश कर्तस्कर, जिल्हा हिवताप अधिकारी, सिंधुदूर्ग, डॉ. गीता कोरे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
गडहिंग्लज येथे आरोग्य सहाय्यक, पर्यवेक्षकांची कार्यशाळा
|