राजकीय
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती उमेदवारांची कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 2/1/2026 12:44:35 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. :- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेतील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची कार्यशाळा खा. धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव तसेच प्रा. जयंत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
या कार्यशाळेमध्ये आगामी निवडणुकीच्या रणनीती, प्रचाराची दिशा, संघटनात्मक बांधणी तसेच मतदारांशी प्रभावी संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नाना कदम, भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव, आदिल फरास, शारंगधर देशमुख यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही कार्यशाळा महायुतीच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी मार्गदर्शक ठरणारी ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती उमेदवारांची कार्यशाळा संपन्न
|