बातम्या

पर्यावरण आणि प्रसारमाध्यमे विषयावर शिवाजी विद्यापीठात शनिवारी कार्यशाळा

Workshop on Environment and Media at Shivaji University


By Administrator - 1/30/2026 2:57:25 PM
Share This News:



पर्यावरण आणि प्रसारमाध्यमे विषयावर शिवाजी विद्यापीठात शनिवारी कार्यशाळा
 

कोल्हापूर ः प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने शनिवार, दि. 31 जानेवारी रोजी पर्यावरणीय लढे आणि प्रसारमाध्यमे या विषयावर  एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते मास कम्युनिकेशन विभागात सकाळी 11 वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होईल.
 

कार्यशाळेत गोव्यातील ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक रमेश गावस हे ‘पर्यावरणीय लढे’ या विषयावर तर गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे ‘पर्यावरण पत्रकारितेची मीमांसा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पर्यावरण अभ्यासक शरद आजगेकर, विनायक देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही कार्यशाळा सर्वांसाठी मोफत असून पत्रकार तसेच पर्यावरणाविषयी आस्था असणार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मास कम्यनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.


पर्यावरण आणि प्रसारमाध्यमे विषयावर शिवाजी विद्यापीठात शनिवारी कार्यशाळा
Total Views: 8