शैक्षणिक
विवेकानंद महाविद्यालयात आपत्कालीन परिस्थितीतील प्रथमोपचार यावर कृतीशाळा
By nisha patil - 7/18/2025 4:24:22 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात आपत्कालीन परिस्थितीतील प्रथमोपचार यावर कृतीशाळा
विद्यार्थी दशेतील वैद्यकीय शास्त्रीय ज्ञान जीवन समृद्ध बनविते - डॉक्टर साईप्रसाद
कोल्हापूर: आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व जाणून घेण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयात इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल इलनेस यांचे मार्फत व्याख्यान आणि कृती सत्र आयोजित करण्यात आले होते . अचानक आणि तात्काळ उद्भवलेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी योग्य तो प्रथमोपचार मिळाल्यास बाधित रुग्णाचे प्राण वाचवले जाऊ शकतात असे मत डॉक्टर साईप्रसाद डायमंड हॉस्पिटल कोल्हापूर यांनी असे मत आपल्या मनोगतात मांडले.
दैनंदिन आणि धक्काबुक्कीच्या जीवनात नैसर्गिक आणि मानवी आपदाना सामोरे जावे लागत असताना शास्त्रीय पद्धतीने परिस्थिती हाताळली असता होणारे जीवित नुकसान आळता येते. तसेच आपत्कालीन परिस्थितीत आपल्या वर्तनाविषयीची प्रात्यक्षिके डॉ रणजीत मोहिते यांनी करुन दाखविली. सदर प्रसंगी इंडियन कौन्सिल ऑफ क्रिटिकल इलनेसचे चेअरमन डॉ हिरेगौडर यांनी कृती आणि प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. या प्रसंगी प्राध्यापिका सौ. गीतांजली साळुंखे यांनी विद्यार्थी दशेत वैद्यकीय शास्त्रीय दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठी या प्रात्यक्षिकांचा उपयोग करून घ्यावा आणि आपले व्यावहारिक जीवन समृद्ध बनवावे असे मत अध्यक्षीय मनोगतात मांडले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत जूनियर सायन्स विभागप्रमुख प्राध्यापक मुकुंद नवले यांनी केले तर आभार प्रा. सुदर्शन शिंदे यांनी मानले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जितेद्र भरमगोंडा यांनी केले . संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर आर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा सौ एस पी पाटील मॅडम यांनी केले . या कार्यक्रमासाठी प्रा नितीन हिटणीकर प्रा किशोर गुजर प्रा सौ चव्हाण प्रा अभिजीत पाटील प्रा सौ म्हात्रे प्राध्यापक वृंद वैद्यकीय कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन करणेसाठी कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय दळवी, प्रशासकीय सेवक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
विवेकानंद महाविद्यालयात आपत्कालीन परिस्थितीतील प्रथमोपचार यावर कृतीशाळा
|