बातम्या
विवेकानंद मध्ये औषधांचे रासायनिक पृथ्थकरण व दर्जा या विषयावर कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 11/24/2025 4:08:10 PM
Share This News:
विवेकानंद मध्ये औषधांचे रासायनिक पृथ्थकरण व दर्जा या विषयावर कार्यशाळा संपन्न
रसायनशास्त्र विभागातर्फे अग्रणी महाविद्यालय कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर 24: विवेकानंद महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागा तर्फे Analytical Techiques Application in Pharmaceutical Anlysis and Quality Control या विषयावरील कार्यशाळा अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत संपन्न झाली. अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत (न्यू कॉलेज क्लस्टर) पार पडलेल्या या कार्यशाळेत बी. एस्सी. व एम. एस्सी. (रसायनशास्त्र) विषयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत (न्यू कॉलेज क्लस्टर) असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेत विषय तज्ज्ञ म्हणून डॉ. रवींद्र गायकवाड (भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज) व डॉ. अजित एकल (इन्स्टा व्हिजन सातारा) यांनी Analytical Techniques व उपकरणे यांचा औषधांच्या उत्पादना मध्ये कसा उपयोग होतो (औषधांचे रासायनिक पृथ्थ्करण) तसेच औषधांचे पृथ्थ्करण,दर्जा कसा टिकवून लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते याविषयी सहभागी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच या क्षेत्रामधील विविध नोकऱ्यांची संधी व विषयाचे महत्व पटवून दिले. सदर कार्यशाळे मध्ये OJT-on Job Training (NEP नुसार) बी. एस्सी. भाग-३ व एम. एस्सी. च्या विध्यार्थ्यांना संकल्पना समजावून सांगून त्याच्या पूर्ततेसाठी मार्गदर्शन केले.
विवेकानंद मध्ये औषधांचे रासायनिक पृथ्थकरण व दर्जा या विषयावर कार्यशाळा संपन्न
|