बातम्या

जागतिक ग्राहक दिन 15 मार्च ऐवजी 18मार्चला-आजरा तहसील

World Consumer Day to be held on 18th March


By Administrator - 3/13/2026 3:07:38 PM
Share This News:



जागतिक ग्राहक दिन 15 मार्च ऐवजी 18मार्चला-आजरा तहसील
 

आजरा(हसन तकीलदार) : दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक ग्राहक दिन आजरा तालुक्यात साजरा करण्यात येणार आहे. १५ मार्च रोजी हा ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो; मात्र या दिवशी सुट्टी असल्याने दि. १८ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय, आजरा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून आपल्या विभागाच्या सेवा व योजनांची माहिती नागरिकांना द्यावी, असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या कार्यक्रमाद्वारे नागरिकांना विविध शासकीय विभागांकडून मिळणाऱ्या सुविधा, सेवा, तसेच ग्राहक हक्कांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जागतिक ग्राहक दिन दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा केला जातो. ग्राहकांचे हक्क, सुरक्षितता आणि योग्य माहिती मिळावी यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. १९६२ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या हक्कांबाबत केलेल्या घोषणेनंतर या संकल्पनेला जागतिक स्तरावर चालना मिळाली. त्यानंतर १९८३ पासून जगभरात १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.


जागतिक ग्राहक दिन 15 मार्च ऐवजी 18मार्चला-आजरा तहसील
Total Views: 18