विशेष बातम्या
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
By nisha patil - 5/6/2025 5:50:06 PM
Share This News:
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
कोल्हापूर – कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत’ या थीमनुसार जनजागृती करण्यात आली.
डॉ. पाटील म्हणाले, “प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवले पाहिजे.” यावेळी अजित पाटील, सुरज राणे, दीपक करपे, बाबासो रानगे, विष्णू पिंगळे आदी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
|