बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
By nisha patil - 7/6/2025 3:25:15 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
कोल्हापूर दि. 06 : जागतिक पर्यावरण दिना निमित्त, ५ जून रोजी डॉ. पी. बी. तेली, डॉ. बी. टी. दांगट आणि डॉ. जी. के. सोनटक्के यांनी संपादित केलेल्या "एनव्हिरॉनमेंटल कन्सर्वेशन, सस्टेनेबिलिटी आणि क्लाइमेट एक्शन” या पुस्तकाचे प्रकाशन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुस्तकासाठी संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे , संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, शैक्षणिक गुणवत्ता हमीच्या डॉ. श्रुती जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख श्री श्रीराम साळुंखे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, श्री गणेश सातव, वरिष्ठ शिक्षणाधिकारी - द क्लाइमेट चेंज रियालिटी प्रोजेक्ट इंडिया यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी विवेकानंद कॉलेजचे प्रबंधक श्री सचिन धनवडे , विवेकानंद संस्थेचे गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
|