बातम्या

विवेकानंद मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागात "जागतिक सूक्ष्मजीव दिवस साजरा

World Microbiology Day


By nisha patil - 12/9/2026 3:26:55 PM
Share This News:



विवेकानंद मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागात "जागतिक सूक्ष्मजीव दिवस साजरा
 

कोल्हापूर दि. 12: विवेकानंद महाविद्‌यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, आयक्यूएसी व एम. बी. एस. आय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सूक्ष्मजीव दिनानिमित दि. 10.09.2026 व 11.09.2026 रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. सी.बी पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.
 

सदर कार्यक्रमावेळी पोस्टर, मायक्रोटून, मायक्रोमर्शियल व वाद-विवाद स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. विजेत्या विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता आयक्यूएसी समन्वयक डॉ. बी. टी. दांगट यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभाने झाली.

सर्व स्पर्धाचे नियोजन प्राचार्य डॉ. एम. एस. हुजरे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बी. टी. दांगट, विभाग प्रमुख डॉ. टी. सी. गौपाले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या केले.


विवेकानंद मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागात "जागतिक सूक्ष्मजीव दिवस साजरा
Total Views: 10