बातम्या

आजरा तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा*

World Pharmacists Day celebrated by the Ajara Taluka


By nisha patil - 9/25/2026 11:49:28 PM
Share This News:



आजरा तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा*
 

*आजरा(हसन तकीलदार):- दिनांक 25 सप्टेंबर 2026 जागतिक फार्मासिस्ट दिवस निमित्त आजरा तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे सकाळी 8:00 वाजता पंडित दीनदयाळ हायस्कूल,आजरा येथे जागतिक  फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व फार्मासिस्ट चे स्वागत  संजय हरेर यांनी केले. नारायण खटावकर यांनी धन्वंतरींचे पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. सौ. उज्वला पाटील यांनी सर्व फार्मासिस्टना फार्मसीची शपथ दिली.

 या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी प्रमाणे दिला जाणारा यावर्षीचा ज्येष्ठ फार्मासिस्ट हा पुरस्कार  सुनील धोंडीराम चव्हाण (न्यू कांचन मेडिकल,आजरा )यांना देण्यात आला तसेच केमिस्ट परिवारातील यावर्षी विविध क्षेत्रातील प्राविण्य प्राप्त केमिस्ट पाल्यांचा सत्कार आजरा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या संचालिका सौ. सुचिता गड्डी,सौ.वर्षा निंबाळकर, सौ.उज्वला पाटील, सौ. सुजाता बेळगुंदकर यांच्या हस्ते देण्यात आला सत्कार समारंभानंतर सर्व फार्मासिस्ट यांच्याशी आपल्या व्यवसायाबद्दल चर्चा सत्र आयोजित केले होते.त्यामध्ये तालुक्यातील सर्व पदाधिकारी व केमिस्ट यांचा सहभाग होता.सर्वांनी आपल्या व्यवसायातील अडीअडचणी काय आहेत व त्याच्यावर उपाय काय करायचे याचे सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले .  सदर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा संचालक  संजय हरेर , तालुका अध्यक्ष अमर पाटील, उपाध्यक्ष  अंतोन नोरोना, सचिव  इरफान सय्यद, खजिनदार दयानंद गिलबिले, संघटना सचिव  पंकज पाटील व तालुका संचालक यांचे योगदान लाभले.


आजरा तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा*
Total Views: 8