बातम्या

जीर्ण साडी, थकलेले पाय – तरीही न्यायालय स्थापनेचा उत्सव पाहण्याची तळमळ”

Worn saree tired legs


By nisha patil - 8/18/2025 2:33:36 PM
Share This News:



जीर्ण साडी, थकलेले पाय – तरीही न्यायालय स्थापनेचा उत्सव पाहण्याची तळमळ”
 

सरन्यायाधीशांच्या शब्दांनी भावूक झालेली सुशीला घेवडे

 मेरी वेदर मैदानावर सर्किट बेंच स्थापनेचा ऐतिहासिक सोहळा सुरू होता. चारही दिशांनी उसळलेली गर्दी, डोळ्यांत चमकणारा आनंद आणि कानावर पडणारे न्यायालयाच्या स्थापनेचे महत्व सांगणारे शब्द... वातावरणच भारावलेले होते.

याच गर्दीत, जीर्ण झालेल्या साडीतली, केसांचा साधा आंबाडा बांधलेली, डोक्यावर पावसापासून बचाव करण्यासाठी पॉलिथिनची पिशवी धरलेली एक महिला तल्लीन होऊन भाषणं ऐकत उभी होती. ही दुसरी-तिसरी कोणी नव्हे तर कोल्हापुरातल्या रस्त्यांवर भंगार वेचून उदरनिर्वाह करणारी सुशीला घेवडे होती.

सरन्यायाधीश भूषण गवई यांचं भाषण संपलं आणि गर्दी हलू लागली. सुशीला बाहेर पडताना तिथेच उभ्या असलेल्या एका वकिलाने उत्सुकतेपोटी विचारलं "ताई, तुम्ही कोण?"

सुशीला हसत म्हणाली "मी सुशीला घेवडे, भंगारवेचक आहे... मोठं कोर्ट आलंय म्हणून बघायला आले."तिच्या बोलण्यातून गरिबांना हे आतात्या वकिलाला तिचं उत्तर आश्चर्यचकित करणारं ठरलं. पण सुशीला पुढे म्हणाली – “मी भंगारवेचक असले म्हणून काय झालं? न्यायालय आलं हे चांगलं झालं, हेवढं मला कळतं. आता गरिबांचाही आवाज कुणीतरी ऐकेल... एवढं सुख अनुभवलं तरी पुरे झालं.” असंच तिला म्हणायचं होतं तिच्या या शब्दाने मात्र नक्कीच भारावतील यात शंका नाही..


जीर्ण साडी, थकलेले पाय – तरीही न्यायालय स्थापनेचा उत्सव पाहण्याची तळमळ”
Total Views: 66