बातम्या

बानगेत उद्या विणेकरी व तुळशीवाल्यांचा पूजन सोहळा

Worship ceremony of Vinekari and Tulsiwala tomorrow in Banga


By nisha patil - 2/8/2025 4:00:11 PM
Share This News:



बानगेत उद्या विणेकरी व तुळशीवाल्यांचा पूजन सोहळा

बानगे (ता. कागल) येथे रविवारी, ३ ऑगस्ट रोजी पंढरपूर वारीसाठी निघालेल्या विणेकरी व तुळशीवाल्या माऊलींचा पूजन सोहळा होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता होईल.

प्रमुख पाहुणे ह. भ. प. डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे, ह. भ. प. सचिनदादा पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत. ८५ विणेकरी व ८५ माऊलींच्या पायांचे पूजन मंत्री मुश्रीफ व त्यांच्या पत्नी सौ. सायरा मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.

दुपारी २ ते ४ ह. भ. प. जयेश भाग्यवंत महाराज यांचे कीर्तन होईल. मुश्रीफ म्हणाले, “मस्तक हे पायावरी या भावनेतूनच हा पूजन सोहळा आहे.”


बानगेत उद्या विणेकरी व तुळशीवाल्यांचा पूजन सोहळा
Total Views: 78