विशेष बातम्या
लेखन समाजाला घडवणारे माध्यम : अच्युत गोडबोले"
By nisha patil - 6/14/2025 10:17:23 PM
Share This News:
लेखन समाजाला घडवणारे माध्यम : अच्युत गोडबोले"
"लेखकाने लिहिलेल्या भावना वाचकाच्या डोळ्यांतून अश्रू ओढतात. चिकाटी व जिद्दीतून साकारलेले लेखन समाजासाठी प्रेरणादायी ठरते," असे प्रतिपादन ख्यातनाम लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. न्यू कॉलेज ऑडिटोरियम हॉलमध्ये लेखिका रंजनकुमारी सुतार लिखित ‘रंजन गुंजन’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील व चेअरमन डॉ. के. जी. पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमास सहलेखक वसंत सुतार, प्रकाशक पराग पोतदार, लेखिका रंजनकुमारी सुतार, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोडबोले पुढे म्हणाले, "आज विज्ञानयुगात चॅट जीपीटी व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे काहीशी भीती पसरली आहे. अशा काळातही अनेक लेखक सातत्याने लेखन करत आहेत, ही गोष्ट जिद्दीची आहे. स्वतःच्या जीवनावर लिहिणे हे कठीण असते, पण रंजनकुमारी सुतार यांनी हे आत्मचरित्र सहजतेने मांडले आहे. अशा प्रकारची आत्मचरित्रे संग्रही ठेवणे काळाची गरज आहे."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा नायकवडी यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. आर. डी. ढमकले यांनी केले, ए. ए. कलगोंडा यांनी लेखिकांचा परिचय करून दिला, तर भावना सुतार यांनी आभार मानले.
Achyut Godbole :लेखन समाजाला घडवणारे माध्यम : अच्युत गोडबोले"
|