बातम्या
यड्रावकरांच्या “भ्रष्टाचाराच्या सहा फायली तयार!
By nisha patil - 11/27/2025 12:08:20 PM
Share This News:
यड्रावकरांच्या “भ्रष्टाचाराच्या सहा फायली तयार!
यड्रावकरांविरोधात नाईक निंबाळकरांचा थेट इशारा –
जयसिंगपूरच्या राजकारणात तापमान उसळले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याविरोधात थेट इशारा दिला आहे. “तुमच्या भ्रष्टाचाराच्या सहा फायली माझ्याकडे तयार आहेत… सहा महिन्यांत ईडी आले तर वाईट वाटून घेऊ नका,” असे ते म्हणाले.
यड्रावकरांनी स्थापन केलेल्या राजर्षी शाहू आघाडीला उत्तर देताना भाजप, काँग्रेसचे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मिळून जयसिंगपूर विकास आघाडी उभी केली आहे. नाईक निंबाळकर म्हणतात की या आमदारांनी पक्षाचे कार्यकर्ते फोडले, पैशाची लूट केली आणि दीड-दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला.
“शांत, सुरळीत निवडणुका व्हायलाच हव्यात, दडपशाही खाली काही चालणार नाही,” असे थेट इशारा देत नाईक निंबाळकर यांनी राजकारणात नवीन वळण दिले आहे. जयसिंगपूरमधील निवडणूक आता फक्त सत्ता बदलाची नाही, तर प्रतिष्ठा, अस्तित्व आणि चौकशीची लढाई बनली आहे.
यड्रावकरांच्या “भ्रष्टाचाराच्या सहा फायली तयार!
|