ताज्या बातम्या
यमुनेच्या पुराच्या पाण्यात बुडाले वृंदावन!
By nisha patil - 8/9/2025 12:22:04 PM
Share This News:
यमुनेच्या पुराच्या पाण्यात बुडाले वृंदावन!
शेकडो घरे जलमय, नागरिक बेघर
उत्तर प्रदेशातील मथुरेतील वृंदावन परिसरात यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापूराचा कहर केला आहे. वाढलेल्या पाण्यामुळे शेकडो घरे जलमय झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दिल्लीतील राजघाटाजवळ नदीची पातळी २०६ मीटरवर पोहोचली आहे. सलग पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढल्याने वृंदावनसह नदीकाठच्या वस्त्या धोक्यात आल्या आहेत. रस्ते, शेतजमीन आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना तातडीने घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले असून, एनडीआरएफ व बचाव पथके मदतीसाठी कार्यरत आहेत.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
या पुरामुळे वृंदावनमध्ये धार्मिक स्थळांनाही फटका बसला आहे. पर्यटकांची मोठी गैरसोय झाली असून, स्थानिकांना पिण्याचे पाणी, वीज आणि अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.
यमुनेच्या पुराच्या पाण्यात बुडाले वृंदावन!
|